अकोला फ्लायओव्हर ब्रिजवर लोखंडी पट्ट्यांचा धोका, अपघातांना आमंत्रण

अकोला : अकोला शहरातील कोला फ्लायओव्हर ब्रिज सध्या वाहनचालकांसाठी गंभीर धोका ठरत आहे. ब्रिजच्या रस्त्यावर पडलेल्या खोल दरारांमधून लोखंडी पट्ट्या बाहेर आलेल्या असून, त्या थेट अपघातांना निमंत्रण देत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, ही समस्या नवीन नसून अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली गेली आहे. मात्र, अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल सुरू झालेली नाही.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या लोखंडी पट्ट्या जीवघेण्या ठरू शकतात.
रोज हजारो वाहनं या मार्गावरून जातात, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना प्रशासनाच्या ढिसाळपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तत्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
वाहनचालकांना सिटी न्यूजकडून आवाहन:
कोला फ्लायओव्हर ब्रिजवर वाहन चालवताना अतिशय सावधगिरी बाळगा, आणि शक्य असल्यास पर्यायी मार्ग वापरा.