अमरावतीत जुने झाड कोसळले, मोठा अनर्थ टळला!
अमरावती : अमरावती शहरातील एका अत्यंत वर्दळीच्या भागात आज मोठा अनर्थ टळला. गेल्या ३ वर्षांपासून शरद जोध आणि महिंद्र लड्ढा यांच्यासह परिसरातील नागरिक या झाडाच्या धोक्याबाबत महानगरपालिकेला वारंवार तक्रारी करत होते. समोर डॉक्टर नवीन सोनी यांचे दवाखाना, बाजूला मोमोजची गाडी, आणि रोज संध्याकाळी ३०-४० नागरिक येथे उभे असतात. तसेच समोर लहान लहान मुले राहतात.
आज अचानक आलेल्या वाऱ्याने हे जुने झाड कोसळले. इलेक्ट्रिक पोल वाकले, मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
हा अपघात टळला हे नशीब, नाहीतर मोठं नुकसान झालं असतं. प्रशासनाकडून मात्र सतत “टाळाटाळ” केली गेली.
सिटी न्यूजला नागरिकांनी सांगितलं की, १५ दिवसांपूर्वीही त्यांनी ही धोक्याची माहिती दिली होती. आजचा प्रकार म्हणजे शहरातील इतर अनेक धोकादायक झाडांच्या बाबतीतही वेळेवर उपाय न झाल्यास, येत्या पावसाळ्यात मोठे अपघात होऊ शकतात याचा इशाराच!