आकाश कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे यश, २९ विद्यार्थ्यांनी गाठले ९०% हून अधिक गुण !

अमरावती : JEE Main 2025 परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अमरावतीच्या आकाश कोचिंग क्लासेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या संस्थेच्या तब्बल २९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवत अमरावतीचं नाव राज्यभर आणि देशपातळीवर उज्वल केलं आहे.
या यशात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे मिथिलेश अग्रवाल या विद्यार्थ्याने, ज्याने गणितात ९९%, भौतिकशास्त्रात ९७% आणि रसायनशास्त्रात ९९% गुण मिळवत एकूण ९९% स्कोअर केला आहे. यामुळे त्याला All India Rank (AIR) 4975 मिळाली असून तो संस्थेचा टॉपर ठरला आहे.
दुसरीकडे, आध्या प्रसाद या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय, इतर विद्यार्थ्यांमध्ये आर्या विघे (९८%), समीर टाले (९७%), वेदांत अग्रवाल (९८%), पृथा धनभार (९७%) आणि अन्य विद्यार्थ्यांनीही दमदार कामगिरी केली आहे.
यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत
या अभूतपूर्व यशामागे संस्थेचे शिक्षक – अमित पांडे, रंजीतकुमार सिंग, प्रीतम पाटील आणि अभिषेक ओबेरॉय यांचे मार्गदर्शन, नीट वेळापत्रक, चाचणी सत्रं आणि वैयक्तिक लक्ष या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. पत्रकार परिषदेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक करत संस्थेच्या अभ्यासपद्धतीवर विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
मिथिलेश अग्रवालने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले,
“ही फक्त सुरुवात आहे… देशाच्या सर्वोत्तम संस्थेत जायचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे.”
भविष्यातील तयारी
आकाश कोचिंग क्लासेस आता JEE Advanced कडे लक्ष केंद्रित करत असून विद्यार्थ्यांना IIT प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन देण्यात येत आहे. या यशामुळे अमरावतीमधील विद्यार्थ्यांसाठी नवे प्रेरणास्थान उभं राहिलं आहे.