उन्हाच्या काहिलीने वाहतूक पोलीसांचा ‘ताप’ वाढला, नागपूर प्रशासन सतर्क; विशेष शीतकक्षाची उभारणी

नागपूर : सध्या संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून, शहरात गेले काही दिवस तापमान सतत 44 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांनाही बसत आहे. सतत उन्हात उभं राहणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी नागपूर पोलीस रुग्णालयाने यंदा विशेष तयारी केली आहे.
गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे अनेक पोलिसांना त्रास झाल्याची नोंद असून, याच पार्श्वभूमीवर यंदा नागपूर पोलीस प्रशासन आणि पोलीस रुग्णालयाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांसाठी पोलीस रुग्णालयात शीतकक्ष उभारण्यात आले आहेत.
पोलीसांसाठी शीतकक्ष, उन्हाच्या काहिलीवर उपाययोजना
तसेच, पोलिसांना उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, यासाठी दररोज मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केवळ तीन महिन्यांच्या उन्हाळ्यात 695 पोलीस कर्मचारी आजारी पडले होते. त्यातील अनेकांना उष्माघात, डिहायड्रेशन, रक्तदाब वाढणे किंवा घसादुखी यांसारख्या त्रासांनी ग्रासले होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून, पोलिसांच्या आरोग्यासाठी वेळेवर आणि प्रभावी उपाययोजना राबवली जात आहेत. सध्या नागपूर सह संपूर्ण विदर्भात तापमान वाढलेला आहे. नागपुरात गेले अनेक दिवस तापमान सातत्याने चढे आहे.
या तीव्र तापमानाचा विपरीत परिणाम कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी रस्त्यावर असणाऱ्या वाहतूक सांभाळण्यासाठी चौकांवर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांवर होत आहे… पोलिसांची काळजी घेण्यासाठी नागपूर पोलिसांच्या पोलीस प्रशासनाने विशेष उपाय योजले आहे.. पोलीस रुग्णालयात विशेष शीत कक्षाची उभारणी तर करण्यात आलीच आहे.. सोबतच रोज पोलिसांना स्वतःची काळजी घेण्यासाठी च्या विशेष सूचना पोलीस रुग्णालयाकडून दिल्या जात आहेत…
वाढत्या तापमानावर नागपूर पोलिसांची शक्कल
सध्या वाढलेलं तापमान पाहता वाहन चालकांना खास करून दुचाकी स्वारांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे… दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान नागपूरातील 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्यात येत आहे… त्यामुळे सिग्नल वर पोहोचल्यानंतर वाहन चालकांना काही सेकंद थांबून अवतीभवतीच्या ट्रॅफिकची स्थिती पुढे जाता येत आहे.. सिग्नलवर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे दुचाकी स्वरांना उष्माघाताचा धोका बळावतो… वृद्ध महिला आणि लहान बालकांना जास्त त्रास होतो.. हे पाहून नागपूर पोलिसांनी दुपारी एक त्याच्यात 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे… तापमान यापेक्षा जास्त वाढल्यास रेड ब्लिंकर वरील सिग्नलची संख्याही वाढवली जाईल तसेच वेळेत बदल करून दुपारी 12 ते संध्याकाळी पाच अशी केली जाईल अशी माहिती नागपूरचे वाहतूक पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे…