छायाचित्रकारासांठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

अमरावती : राज्यातील सर्व फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स यांच्या कल्याणासाठी तेलंगना सरकारच्या धर्तीवर एक महामंडळ व डेडिकेटेड शासकीय स्वायत्त विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कला कौशल्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांच्या शिष्मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली. भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात संस्थेचे मनिष जगताप यांनी नागपूर येथे मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण केले.मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक बैठक आयोजित करुन या क्षेत्राचा आराखडा तयार करुन महामंडळ अथवा तत्सम व्यवस्था उभारण्याबाबत धोरण ठरविण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन दिले .
छायाचित्रण व चलचित्रिकरण क्षेत्रात अनेक जण काम करीत.या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठयाप्रमणात आहे परंतु विखुरलेल्या अवस्थेत आहे,त्यामुळे या क्षेत्राला कलेचा व फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स यांना कलाकाराचा दर्जा देवून अधिकाधिक कौशल्य व नैपुण्य मिळविण्यासाठी डेडिकेटेड स्वायंत विद्यापीठ स्थापन करुन महामंडळ स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.जेणे कलेला वाव मिळुन प्रत्येक कलाकारांची नोंद होवुन शासनाचे विविधांगी लाभ व सोयी सुविधा मिळेल. छायाचित्रण व चलचित्रिकरण या क्षेत्रातील कलाकाराच्या कलेचे प्रर्दशन भरविण्यासाठी मुंबईतील जहागिर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर विदर्भात आर्ट गॅलरीचे निर्माण करण्याची मागणी केली असता याची खरेच विदर्भातील कलाकारांना गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले याबाबत सुध्दा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.यावेळी अमरावती व नागपूर विभागातील पदाधिकारी धिरज मानमोडे, मनीष जगताप, प्रणव हाडे, मोहन कोहळे, हर्षीता कावरे,केतन नंदनवार इत्यादी उपस्थित होते.