पहलगाम हल्ला: पाकिस्तानचा कट? हल्ल्याच्या टायमिंगमागे 5 संशयास्पद कारणं, महाराष्ट्रातले 6 पर्यटक ठार

काश्मीरच्या पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर केलेल्या भीषण गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असताना, आता या हल्ल्यामागचं ‘टायमिंग’ चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून करण्यात आला असून त्यांना 2-3 स्थानिकांची साथ लाभली होती. दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याचंही समोर आलं आहे.
- हल्ल्यामागची 5 प्रमुख कारणं –
अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा भारत दौरा
JD व्हान्स यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर हल्ला - अमेरिकेला “आम्ही कधीही, काहीही करू शकतो” असा इशारा
- सी-१७ ग्लोबमास्टरसह सुरक्षेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
- नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा
भारत-सौदी संबंध वाढणं पाकिस्तानला खटकले - सौदीने भारताशी अब्जावधींचे करार, पाकला झिडकारले
- काश्मीरचा वाद संपलेला नाही, असा खोटा संदेश पसरवण्याचा प्रयत्न
- काश्मीरमध्ये पर्यटकांची वाढती संख्या
- यंदा 2.35 कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली
पर्यटन वाढल्याने दहशतवाद्यांचा अस्वस्थपणा
शांततेचं चित्र मोडण्याचा प्रयत्न
- अमरनाथ यात्रेला इशारा
अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू - यात्रेपूर्वी भीती निर्माण करण्याचा उद्देश
- पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे वक्तव्य
“काश्मीर म्हणजे गाझा” – वादग्रस्त तुलना - “काश्मीर आमच्या गळ्याची नस आहे” – पाकची उघड धमकी
हल्ल्यात महाराष्ट्राचं मोठं नुकसान
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये –
- डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी
- पुण्याचे संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे
- पनवेलचे दिलीप देसले
- जखमी – एस. बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल
दैव बलवत्तर म्हणून वाचले काही पर्यटक
हल्ल्याच्या काही मिनिटे आधीच अमरावतीमधील 11 पर्यटक घटनास्थळावरून निघाले होते. बोडके, देशमुख, उमेकर आणि लांडे कुटुंबीयांचे प्राण थोडक्यात वाचले. सध्या हे सर्व श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत.
सांगलीचे डॉ. विठ्ठल पालांदे आणि कुटुंबीय हल्ल्याच्या तीन तास आधी चित्र काढून निघाले.
जळगावच्या किशोरी वाघुळदे व रेणुका भोगे या मैत्रिणींनाही सुरक्षारक्षकांच्या तत्परतेने वाचवण्यात आले.
हल्ल्याचे पर्यटनावर परिणाम
या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी काश्मीरच्या ट्रिप्स रद्द केल्या आहेत.
पंढरपूरहून गेलेले 50 पर्यटक थेट परतीच्या प्रवासाला लागले आहेत.