LIVE STREAM

Latest NewsNagpur

15 एप्रिलला अविनाश भुसारी हत्याकांड : आरोपींना मदत करणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई

नागपूर : 15 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अविनाश भुसारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर गंभीर गुन्ह्यात आता आरोपींना मदत करणाऱ्यांवरही पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणात सिमरन रोहित लोखंडे आणि ऋषभ हरीश वानखडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी नागपूर येथील हिरणवार यांच्याकडे आरोपींना लपवून ठेवले होते. तसेच नागपूरहून बडनेरासाठी कार उपलब्ध करून देणे, आणि बडनेऱ्यावरून भुसावळसाठी तिकीट खरेदी करून देण्यास मदत केली होती.

याशिवाय, सिमरनने आपल्या यूपीआय आयडी वरून बाबुळ हिरणवार यांच्या खात्यावर आर्थिक व्यवहारही केला आहे. ही सर्व मदत आरोपींचे मावस भाऊ असल्यामुळे नातेसंबंध जोपासण्याच्या हेतूने केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांव्यतिरिक्त एक विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. अशा प्रकारे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या गुन्ह्यात एकूण 10 ते 12 जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!