Latest NewsNagpur
गॅलरीतून पडून चिमुकलीचा मृत्यू, पारडीतील रामभूमी सोसायटीत दुर्दैवी घटना

नागपूर : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामभूमी सोसायटीत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. फ्लॅट नंबर १४४ मध्ये राहणारी कु. हितांशी प्रफुल चौवर (वय १ वर्ष १० महिने) ही चिमुकली खेळताना तोल जाऊन गॅलरीतून खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
तिला तात्काळ नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घरातील गॅलरी, बाल्कनी आणि खिडक्यांचे संरक्षण अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.