Amaravti GraminLatest News
पहलगाममधील हल्ल्यानंतर परतवाडा येथील पर्यटक सुरक्षित

परतवाडा – काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना, परतवाडा येथून गेलेल्या १५ पर्यटकांच्या सुरक्षिततेची बातमी ही एक मोठी दिलासा देणारी गोष्ट ठरली आहे.
गजानन यात्रा कंपनीमार्फत पहलगामला गेलेले हे १५ पर्यटक पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांनी स्वतःचा व्हिडीओ सिटी न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांना पाठवून आपली सुरक्षितता स्पष्ट केली आहे. या व्हिडीओमुळे त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांच्याही मनातील भीती दूर झाली आहे.
दरम्यान, हिंदू युवा वाहिनीचे प्रभारी अभय बाजपेयी आणि कोषाध्यक्ष योगेश थोरात यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.