सहसंचालक प्रदीप घुले यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

अमरावती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना ‘उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे, संवाद फोरम’ उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा 2024-25 या वर्षातील राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालयाच्या उपक्रमांची प्रथम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.