हळदीची यशस्वी पेरणी! शिवार घोडेकर शेतकऱ्याच्या जैविक हळदीला बाजारात ३ लाखांचा भाव

नांदेड – अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर येथील शेतकरी यांनी जैविक पद्धतीने हळद उत्पादन करून ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवले आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ १७०० रुपयांचे ५०० ग्रॅम हळदीचे बेणे ऑनलाईन घेतले आणि सातत्याने त्याच बेण्यांचा पुनर्वापर करत अडीच ते तीन क्विंटल हळद उत्पादन मिळवले.
विशेष म्हणजे, या हळदीची लागवड केवळ सेंद्रिय शेती पद्धतीने केली गेली. यात शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क आणि गोमूत्र फवारणीचा वापर करून या हळदीची जोपासना करण्यात आली.
हळदीची गुणवत्ता इतकी उच्च प्रतीची ठरली की आज डॉक्टर, परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक औषध दुकानदार या हळदीला ₹१००० प्रति किलो दराने खरेदी करत आहेत. शिवार घोडेकर यांनी स्पष्ट केले की,
“आम्ही कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही. केवळ दर्जेदार उत्पादनामुळे हळद स्वतःच विकली जाते आहे.”
या उदाहरणातून सेंद्रिय शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळत आहे. बाजारपेठेतील मागणी आणि दर्जावर भर दिल्यास शेती हा फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे या यशस्वी प्रयोगातून स्पष्ट होते.