पुसदमधील वसंत नगरमध्ये गुटखा साठा जप्त – दोन आरोपी अटकेत

पुसद : पुसद शहरातील वसंत नगर येथील उर्दू शाळा क्र. 3 जवळील एका घरात प्रतिबंधित सुगंधी गुटखा विक्रीसाठी साठवून करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर घरात धाड टाकून मोठा गुटखा साठा जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवार 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरसीपी पथक क्रमांक 1 ने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. सदर कारवाई मा. कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद हर्षवर्धन बी. जे. यांच्या देखरेखीखाली पार पडली.
सदर धाडीत हकीमोद्दीन करिमोद्दीन (वय 35) व शेख मुख्तार शेख रशीद (वय 27, दोघेही रा. वसंत नगर) यांना अटक करण्यात आली आहे. हकीमोद्दीन याच्या घरातून एकूण 1,91,496 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय.
सदर कारवाई आरसीपी पथक क्रमांक 1 चे अंमलदार अभिजित सांगळे, उमेश राठोड, नरेश नरवाडे, पराग गिरनाळे, राहुल मडावी व संगली चांदले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.