अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची संधी

मुंबई : लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेला अवघे काही दिवस बाकी असतानाच, सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज सोन्याचे दर कमी होत असून, आजही किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण
गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ₹98,210 आहे, जी कालच्या तुलनेत ₹30 ने कमी आहे.
८ ग्रॅम सोन्याची किंमत ₹78,586 इतकी झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ₹90,020, तर ८ ग्रॅमसाठी ₹72,016 इतकी आहे.
१८ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ₹73,660 असून, ८ ग्रॅमसाठी ₹58,928 इतकी आहे.
चांदीच्या दरात स्थिरता
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
८ ग्रॅम चांदीची किंमत ₹807,
१० ग्रॅमसाठी ₹1,009,
तर १०० ग्रॅमसाठी ₹10,090 इतकी आहे.
गुंतवणुकीसाठी सोनं फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरते. सोन्याचे भाव वरखाली होत असले तरी कालांतराने त्यात वाढ होतच असते. त्यामुळे बँकेच्या ठेवींऐवजी सोनं हे तुलनेत अधिक चांगला परतावा देऊ शकते.
ग्राहकांसाठी खरेदीची योग्य वेळ
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही घसरण तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.