पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा

पुसद : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी पाकिस्तानी जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड गोळीबारात २७ निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची अमानुष घटना संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पुसद शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चादरम्यान शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि दहशतवादाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या मूक मोर्चामध्ये पुसदमधील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शांततेच्या मार्गाने आपला संताप व्यक्त करत, देशाच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.
हा मूक मोर्चा एकतेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती जागरूकतेचे प्रतीक ठरला असून, पुसद शहरातील नागरिकांनी देशहितासाठी एकत्र येण्याचे दर्शन घडवले.