अर्धापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप

नांदेड : अर्धापूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा ऑनलाईन सर्विस यांच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे, नगराध्यक्ष परविन देशमुख तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शीतल कांबळे यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल, मिठाई व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ पार्किंगच्या वादावर तलवारी चालवली जात असेल, तर भविष्यात अकोल्याची शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.