आमदार रवी राणा यांचा वाढदिवस: देशधर्म आणि सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारे कार्य

अमरावती : पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली व स्मरणार्थ निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर व सर्व श्रेष्ठ दान रक्तदान शिबिर आयोजित करून आ. रवी राणा यांचा दि.२८/०४/२५ रोजी वाढदिवसा निमित्ताने… ना हार ना पुष्प गुच्छ देश धर्म प्रति कर्तव्याचे भान… सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारे आमदार रवि राणा हे देश _धर्म रक्षणासाठी सदैव तत्पर असतात अश्यासाठी त्यांची प्राथमिकता असते त्यांचे सुचणेवरून युवा स्वाभिमान पार्टीचे व भाजप यांच्या संयुक्त आयोजित पहलगाम येथे दहशतवादयांचें भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना राजापेठ चौकात या पूर्वीच श्रद्धांजली वाहिली यावेळी आ.रवी राणा यांच्या पत्नी सौ.नवनीत राणा व भाजपा व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या ही दि.२८/०४/२५ रोजी संत ज्ञानेश्वर संस्कृतीत भवन मोर्शी रोड अमरावती येथे आयोजित सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारे आमदार रवी हे प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करून तसेच जखमी नागरिक लवकर बरे होण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहेत.तसेच सर्व श्रेष्ठ दान रक्तदान सामूहिक रक्तदान शिबिर घेऊन त्या रक्ताचा उपयोग तातडीने गरजू रूग्ण रक्षणासाठी दानरक्त बॉटल हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून देणार आहेतः तसेच निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे.असे त्यांचे वाढदिवसाचे नियोजन आहेः विशेषता या दिवशी फुल गुच्छ स्वीकारनार नाहीं.असा हा त्यांचा वाढदिवस सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारा. देश धर्म सर्वात अगोदर असा विचार घेऊन असणार.
आमदार रवी राणा यांच्या कडे कधीही पेन, डायरी कधीचं नसते त्यांचें नियोजन म्हणजे अलिखितच” मात्र त्यांचे लोक सेवाभक्ती कार्य चोवीस बाय सात असेच आहेः ( २४/७ ) त्यांची तल्लख बुद्धी मुळे कोणतीही जुनी गोष्ट त्यांना आठवते. त्यांचे दिमतीला त्यांचे कुटुंबीय सदस्य तेवढ्याच प्रेमाने त्यांना साथ देऊन आलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करत असतात.सोबत च युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकारी. कार्यालयीन स्टॉप आहेच.
आ.रवी राणा यांचे अलिखीत नियोजन म्हणजे आधुनिक काळातील चमत्कारिक राजकीय गणितच.
कोनत्या ठिकाणीं किती वावं आहे.या बाबतचे तर्कज्ञानाचे जाणकार.
आ. रवी राणा आहेतः ते अजब रसायन आहे त्यांना कोनत्या गोष्टी कुठे सूरू करायची व कुठे संपवांयची त्या पासुन काय प्राप्त होईल हे त्यांचे त्यांना चं माहिती असते.
“मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” या उक्ती प्रमाणे आ. रवी राणा हे नेहमीचं प्रसन्न असतात. ते त्यांच्या कडे येणाऱ्या लोकांना मध्ये मिसळून आपलेसे करतात असे वाटते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी प्रसन्ननतेने त्यांचे दुःख कमी करण्याचा त्यांचे समस्या सोडविणेबाबत प्रयत्न करत आहेत. अगदी आनंदाने, आस्थेने विचारपूस केली जाते त्याचे अडचणी सोडविण्यासाठी राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री यांचे पासून ते मंत्री, सनदी अधिकारी मंत्रालयीन सचिव ते जिल्हाधिकारी यांच्या पासून ते अगदी खालचे कर्मचारी घटक यांच्या सोबत संपर्क साधून आ.राणा प्रशासकिय काम करत असतात मात्र प्रसन्नता तीच कुठेच कुणाचा अनादर नाहीं. ज्या द्वारे आलेल्या लोकांचे काम होऊन त्यांचे चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून आमदार त्यांना दिलेल्या मतदानाची सेवा पावती समजतात. हाच सेवा नियम त्यांचे कडे काम घेऊन आलेल्या कष्टकरी, शेतकरी. शेतमजूर, व्यापारी वर्ग, अधिकारी, विद्यार्थी. म्हातारे यांनाही तशीच वागणूक देऊन त्यांची भिती कमी करून त्यांचेत सकारात्मकता निर्माण करून प्रोत्साहन देण्याचे काम राणा करतात त्या साठी दैनदीन कामात ते व्यस्त असतात. पाहू, ठेऊ.बघू, उद्या बघू.करावे लागेल असे वेळ मारून नेणारे शब्द त्यांचे डायरीत नाहीत.लोकांचे सेवा कार्य करण्यात त्यांचे समाधान _आनंदात आ.राणा देव पाहतात.
सुखाचे, आनंदाचे माप मोजणे प्रत्येक व्यक्तीचे विचारसरणीवर अवलंबून आहे कोण कोणत्या नजरेने त्यांच्याकडे बघतो तो तो त्यांचा विचार आहे. मात्र ते सर्व सामान्याचे चाहते आहेत.लोकांनसाठी, विकासकार्यासाठी एवढं स्वतःला झोकून द्यावं की स्वतःच्या प्रकृतीकडे ही लक्ष देऊ नये अशी त्यांची ख्याती एकचित्त होऊन दैनंदिन लोकाभिमुख कामे करीत असतात. त्यामध्ये त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतच असते मात्र ते कधी जाहीर करीत नाही.
“विधीमंडळ अध्यक्ष आश्वासन समितीच्या द्वारे”
राज्यातील, मंत्रालयीन, अधिकारी वर्ग, सर्व सामान्य जनता यांना न्याय देण्याचे पवित्र विधायक कार्य आ. राणा आता करणार आहेत.
राजकीय क्षेत्रात कार्यरत असुनही ना धर्म ना पंथ, ना प्रांत सर्वांना सन्मानाची वागणूक. सर्वसामान्य लोकांचे लोकाभिमुख विषय असो ज्यांची कोणतीही ओळख नाही, वशिला नाही, अशा लोकांची विषय, मुद्दे ला विधानसभा सभागृहात, शासनाकडे बैठकी लावून पत्र लिहून वाचा फोडण्याचे काम आ. राणा हे सातत्याने करतात. आता त्यांना वरील समितीचे माध्यमातून अधिकार मिळाले आहेत.*
कोशिश करणे वालो की हार नहीं होती! पंख होणे से कुछ नहीं होता! होसलो से उडान होती है!
असा आमदार रवी राणा यांची काम करण्याची अलग शैली आहे.
सर्व व्यासंगी विकासाचे महामेरू आमदार रवी राणा यांचा दिनांक २८ एप्रिल २०२५रोजी वाढदिवस आहे.वाढदिवस म्हणजे एक नवी सुरवात.आपल्या जिवलगांना एकमेकांशी घट्ट बांधणारा हा दिवस.आयुष्यातील आजवर मिळवलेले यश. आपले कर्तृत्व आणि बुद्धीमतेच्या बळावर समाजकार्य घडावे आणि राष्ट्र हितासाठी आपले भरीव योगदान लाभावे. आपली साथ माझ्यासाठी नेहमीच माझ्यासाठी व आपल्यावर स्नेह.प्रेम करणारे इतरांसाठी आवश्यक आहे.आपला पुढील काळही यशस्वी, आनंदित जावो.या वाढदिवस निमित्ताने मी उमेश ढोणे महासचिव, ३३- अण्यायग्रस्त जमाती, म. कृ. समिती, महाराष्ट्र राज्य, मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.त्यांची प्रकृती सुदृढ राहो. त्यांच्याकडून लोकांचे अधिका अधिक लोकाभिमुख कामे होवो देवाचे चरणी प्रार्थना करतो.