Amaravti GraminLatest News
मोर्शीत काँग्रेसचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन शेतकरी कर्जमाफी व नुकसानभरपाईसाठी जोरदार मागणी

मोर्शी : मोर्शीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात तीव्र आंदोलने; कर्जमाफी आणि शेतकरी हिताच्या मागण्यांचा आवाज
मोर्शी तालुक्यात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलने केली. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफी जाहीर करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी सरकारला चेतावणी दिली की, जर लवकरच कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचा धोका आहे.
- यावेळी काँग्रेस नेत्यांनी काही प्रमुख मागण्या पुढे मांडल्या:
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे.
- २०२४-२५ मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे झालेले नुकसानभरपाईची रक्कम त्वरित वितरित करावी.
- शेतकऱ्यांना पिकविम्याची थकित रक्कम लवकरात लवकर मिळावी.
- घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते तातडीने वितरित करावेत.
- शेतकऱ्यांना पिकांसाठी भावांतर योजनेतून अनुदान द्यावे.
- सिंचनासाठी दिवसा पाणीपुरवठा करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
- सोयाबीन, तूर, कपाशी व चणा यांसारख्या पिकांना सध्या बाजारात मिळत असलेल्या कमी दरांमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा.
या आंदोलनात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने शेतकरी हिताच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे केली.