रणरणत्या उन्हात पक्षांना वाचविण्यासाठी प्राणी मित्रांची धडपड

तिवसा : सध्यास्तीतीत रखरखत्या उन्हाळ्याला सुरुवात झाली विहीरी, तलाव, कोरडे पडू लागले असून गावानजीक असणाऱ्या जगलातील पानवटे देखील आटायला लागले आहे.अश्या परिस्थितीत तालुक्यातील प्राणी मित्र व सामाजिक कार्यकत्यांनी रानातील पक्षांना वाचविण्यासाठी धपड केली असून पाखरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावानजीक तसेच जंगल परिसरात मातीची जलपात्र लावून त्यात नियमित पाणी टाकण्याचा उपक्रम राबवून पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. तिवसा तालुक्यात गुरुदेवनगर बसस्थानक, मोझरी, वन्हा, कुन्हा, कौडन्यपूर गावानजीक मोठे घनदाट जंगल आहे. या जगलं परिसरात विविध प्रजातीची पक्षी असून या पक्षांना जगलामध्ये उपलब्ध असणारे पाणवठे व पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे. परंतू दिवसेंदिवस तप्त उन्ह व उन्हाची दाहकता लक्षात घेता पाण्याअभावी नदी नाले ओस पडले असून. पाण्याचे स्रोत देखील आटले आहे. यामुळे जगलं परिसरात मुक्त विहार करणाऱ्या पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता तिवसा तालुक्यातील शुभम विघे, या प्राणी मित्रानी हेलपिंग हॅन्ड ग्रुप तर्फे ठीक ठिकाणी जलपात्र लावले असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
यावर्षी तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर, मोझरी, वर्हा, कुन्हा, कोडण्यपूर, या परिसरात हे जलपात्र लावण्यात आले आहे या जगलं परिसरात पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राबविल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात पशु व प्राणीमित्र शुभम विघे, प्रजवल लोखंडे, रोहन वानरे, तेजस साबळे, सागर अटाळकर, गौरव काळे, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहे.
सध्या कडक उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून प्रत्येकाने पक्षांसाठी घराच्या छतावर पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहन यानिमित्ताने पक्षीमित्रांकडून सुचविले जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पशुपक्षी मृत्यू मुखी पडतात त्यांना उन्हाळ्यात सहज पाणी उपलब्ध व्हावे याकरीता हेलपिंग हॅन्ड ग्रुपतर्फे राणा वनात, गावानजीक ,अनेक ठिकाणी पक्षांसाठी जलपात्र लावण्यात आले आहे