राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

अमरावती : राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक, सल्लागार राहिलेले ग. दि. कुलथे यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. संदीप इंगळे, डॉ. संजय कावरे, डॉ. क्रांती कटोले, श्री. फिसके, श्री. धात्रक, श्री. जवंजाळ यांनी स्व. ग. दि. कुलथे यांच्या कार्यास उजाळा देऊन भावना व्यक्त केल्या.
यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप इंगळे, उपायुक्त डॉ. संजय कावरे, श्री. जवंजाळ, डॉ. क्रांती काटोले, अभियंता श्री. धात्रक, प्रवीण इंगळे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. फिसके, श्री. देव, जिल्हा उपनिबंधक श्री. कुंभार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अभियंता श्री. बकाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पेठे, डॉ. महल्ले, डॉ.खाजोने, डॉ. खेरडे, डॉ. तेलंग आदी उपस्थित होते.