वडाळी राहुल नगरातील नाल्यात अज्ञात आजाराने 3डुक्कराचा मृत्यू, परिसरात दुर्गंधी

अमरावती : राहुल नगर बिच्चू टेकडी परिसरातील मोठ्या नाल्यात अज्ञात आजाराने चार डुकरांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठवड्यात मृत डुकरांचा शोध लागला, ज्यामुळे नाल्यातील घाण आणि कचऱ्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये तीव्र दुर्गंधी पसरली. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.
नागरिकांनी या समस्येचा आवाज माजी नगरसेवक बबलू शेखावत यांच्याकडे पोहोचवला, आणि रविवारी तक्रारीच्या आधारावर बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर, मनपाचा जेसीबी रविवारी नाल्यात उतरला आणि मृत डुकरांना बाहेर काढले.
नाल्यातील घाणीच्या साम्राज्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला असून, नाल्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे साप आणि विंचू घरात प्रवेश करत आहेत. यामुळे नागरिकांचे जीवन अधीर झाले आहे.
नाल्यातील घाणीची परिस्थिती लक्षात घेऊन, स्थानिक रहिवाशांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे की, मानसूनपूर्व नाल्याची योग्य पद्धतीने साफसफाई करावी आणि नाल्यातील गाळ व कचरा ट्रकद्वारे एका बाजूला एकत्र करून वील्हेवाट लावावी.