LIVE STREAM

India NewsLatest News

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई! आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलांनी काल रात्री उशिरा बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनी भागात लष्कर-ए-तैयबा (LeT) चा सक्रिय दहशतवादी जमील अहमद याचे घर उडवून दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांच्या पथकाने दहशतवादी अदनान शफीचे घर पाडले होते. अदनान २०२४ मध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि गेल्या एक वर्षापासून तो खोऱ्यात सक्रिय होता. तर कुपवाडा येथील सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचे घर तीन सेकंदात उडवून दिले होते. फारुख सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे आणि तिथून दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती समोर येत आहे.

9 दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त
बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनीतील जमील अहमद आणि जैनापोरा येथील अदनान शफी यांच्याव्यतिरिक्त सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांची घरे पाडली त्यात फारूक, अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे, त्रालमधील खासीपोरा येथील अमीर नजीर आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी यांचा समावेश आहे.

स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन
शुक्रवारी सुरक्षा दलाने पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे मानले जाणाऱ्या दोन दहशतवाद्यांची घरे पाडली. बिजबेहरा येथील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचे घर आयईडीने उडवून देण्यात आले. तर त्रालमधील दहशतवादी आसिफ शेखचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान, सुरक्षा दलाने दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध कडक भूमिका सुरूच राहील. स्थानिक लोकांनी शांतता आणि सहकार्य राखण्याचे आवाहन केले आहे.

60 हून अधिक ठिकाणी धाडसत्र
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराकडून जोरदार शोधमोहीम राबवण्यात येत असून 60 हून अधिक ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना सहकार्य केल्याच्या संशयावरून जवळपास 175 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. खोऱ्यातील जवळपास 14 दहशतवादी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!