AkolaLatest News
अकोल्याच्या मोहम्मद अली रोडवरील किसान हार्डवेअर दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

अकोला : अकोल्यातील मोहम्मद अली रोड मार्गावर स्थित किसान हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भयंकर होती की दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. त्यांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग इतर दुकानांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आली.
सध्या अग्निशमन विभागाकडून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.