अविनाश भूसारी चे हत्यारी हिरणवार टोळी पोलिसांच्या ताब्यांत

नागपूर : नागपूर शहराच्या अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी सोशा कॅफेच्या संचालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या तपासात पोलिसांनी उघड केले की या घटनेमागे कुख्यात हिरणवार टोळीचा हात होता.
हत्येनंतर आरोपी फरार होते, मात्र अंबाझरी पोलिसांनी तपास कार्यवाही त्वरित सुरू केली आणि काही आरोपींना अटक केली. अखेर, 27 एप्रिल रोजी पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिताफीने उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने तातडीने कार्यवाही करत आरोप्यांना ताब्यात घेतले असून, तपास अधिक खोलवर सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या यशस्वी कार्यवाहीमुळे नागपूरच्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, आणि अंबाझरी परिसरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली आहे.