बांगलादेशी खोट्या दस्तावेजांच्या आधारे मिळवतायत भारतीय नागरिकत्व; किरीट सोमय्या यांचा खळबळजनक आरोप

यवतमाळ : बांगलादेशी नागरिक खोटे प्रमाणपत्र दाखवून भारतीय नागरिकत्व मिळवत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यवतमाळ दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या २ लाख २३ हजार जन्म प्रमाणपत्रांचे पुनर्परीक्षण सुरू आहे. बांगलादेशी नागरिक खोटे दस्तावेज तयार करून भारतीय ओळख मिळवतात. यातील अनेकांचे आधार कार्ड सुद्धा फसवे आहेत.
सोमय्या यांनी उदाहरण देताना सांगितले की, विक्रोळी भागात १९ फेरीवाल्यांना बांगलादेशी असल्याचे उघडकीस आणले आहे. या बऱ्याच जणांचा जन्म १ जानेवारी दाखवलेला आहे आणि वडिलांचाही जन्म तारीख १ जानेवारी असल्याचे दाखवले जाते, जे संशयास्पद आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या संदर्भात लवकरच एफआयआर दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील पुसद शहरात सुमारे ४०० अर्जांवर चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई केली जात आहे.
यावेळी किरीट सोमय्या यांनी यवतमाळ तहसील कार्यालयात भेट देऊन जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार सादर केली.
सोमय्या यांनी पुढे सांगितले की, “भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी बांगलादेशी लोक संगनमताने खोट्या जन्म प्रमाणपत्रांचा वापर करतात, आणि त्यात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.