विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्याथ्र्यांची सेवाग्राम व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शैक्षणिक भेट

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्याथ्र्यांनी नुकतीच वर्धा जिल्ह्यातील शांतीस्तुप, सेवाग्राम आश्रम, बोरधरण आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे शैक्षणिक भेट दिली. यावेळी विभागातील ज्येष्ठ प्रा. डॉ. वामन गवई, प्रा. रामचंद्र वरघट, डॉ. पवनकुमार तायडे, प्रा. सुरेश पवार, गजानन बनसोड, आदिनाथ अंभोरे, राजकुमार मतले, अरुण अंभोरे, सुधाकर पाटील, सिध्दार्थ बनसोड, मनोहर पाटील, गौरव ठाकरे, किरण यावले, योगीता थोटे, कमलताई चवरे, अनुराधा तायडे, वर्षा दामले, प्रकाश कांबळे, दिपक ढोले, कोहिनूर काळे, सुबोध काळे सहभागी झाले होते.
शांतीस्तूप येथे तथागत गौतम बुध्द यांना वंदन करून या शैक्षणिक भेटीला सुरुवात करण्यात आली. बुध्दाच्या विविध रूपातील मूर्तींना सर्वांनी अभिवादन केले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमामधील संग्रहित मौल्यवान वस्तूंची माहिती विद्याथ्र्यांनी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या भेटीला आले असतांना त्यांनी ज्या दगडावर बसून समाजबांधवांना मार्गदर्शन केले होते, तो दगड आठवण म्हणून अजूनही तेथे असून तेथे सर्वांनी भेट दिली व त्याबाबत ऐतिहासिक पार्·ाभूमी प्रकाश कांबळे व दीपक ढोले यांनी विद्याथ्र्यांना सांगितली. पाली व हिंदी साहित्याचे गाढे अभ्यासक प्रकांड पंडित, डॉ. धर्मानंद कोसंबी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. बोरधरण येथील विहार, त्यानंतर महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूर्चीवरील दुर्मिळ पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी डॉ. ससाने, डॉ. मिरगे यांनी विद्याथ्र्यांना यासंदर्भात माहिती दिली. विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच त्यांनतर गांधी विला येथे विद्याथ्र्यांनी भेट दिली. विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक भेटीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.