हातात तलवार घेऊन नवनीत राणांचा पाकिस्तानला इशारा; “जो हिंदुस्थान पे आख उठायेगा, उसकी आख निकालेंगे”

अमरावती : भाजप नेत्या आणि खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. “जो हिंदुस्थान पे आख उठायेगा, उसकी आख निकालेंगे,” असे म्हणत नवनीत राणांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात तलवार घेऊन दिलेला हा इशारा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी नवनीत राणांना खास भेट म्हणून तलवार प्रदान केली. या प्रसंगी नवनीत राणांनी तलवार हातात घेत पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या आणि “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा गगनभेदी घोषणा करत देशभक्तीचा नारा दिला.
यावेळी नवनीत राणांनी भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधही व्यक्त केला. पाकिस्तानने सातत्याने भारतविरोधी कारवाया केल्यास, भारत कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रवी राणांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.