LIVE STREAM

gold rateLatest News

अक्षय्य तृतीयेच्या आधीच ग्राहकांसाठी Good News! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या भाव

Gold Rate Today: अक्षय्यतृतीयेच्या एख दिवस आधीच सोनं स्वस्त झालं आहे. 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी लोक सोनं किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानतात. यावर्षी 29 एप्रिलच्या संध्याकाळी 5.31 ते 30 एप्रिलच्या दुपारी 2.12 पर्यंत अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. सोन्याची खरेदीदेखील याच वेळी केली जाण्याची शक्यता आहे. अक्षय्यतृतीयेला एक दिवस बाकी असतानाच आज 29 एप्रिल रोजी सोनं स्वस्त झालं आहे. आज काय आहेत सोनं-चांदीचे भाव जाणून घ्या.

29 एप्रिल रोजी मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 95,277 रुपयांवर येऊन पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 89,390 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीची किंमतीतदेखील घसरण झाली आहे. आज चांदी 96245 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

सोनं आणि चांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील घसरण पाहायला मिळतेय. ट्रेड वॉरचे टेन्शन कम होताच सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा दरात तब्बल 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळं 3325 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. चांदीच्या किंमतीतदेखील 33 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. गुंतवणुकदारांची नजर आता अमेरिकेच्या आकड्यांवर आहे. ज्यमुळं फेडरल बँकेच्या व्याजदरात निर्णय घेण्यात येणार आहे.

सोन्याच्या किंमतीत घसरण का?
शुक्रवारी, चीनने काही अमेरिकन आयातींना 125 टक्के कर आकारणीतून सूट देण्याची घोषणा केली. तथापि, त्यांनी कोणत्याही औपचारिक व्यापार वाटाघाटी सुरू असल्याचे नाकारले. दरम्यान, यूएस फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की त्यांना चलनविषयक धोरणात बदल करण्याची तात्काळ आवश्यकता वाटत नसून त्याऐवजी त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या शुल्काच्या आर्थिक परिणामांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. या आक्रमक भूमिकेवरून असे दिसून येते की नजीकच्या भविष्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. यामुळे सोन्यावर आणखी दबाव येईल. साधारणपणे, व्याजदर जास्त असताना मागणीवर परिणाम होतो. व येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!