अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांना राष्ट्रीय युवा देशरत्न सन्मान

देशाच्या माजी मुख्य न्यायाधीशांच्या हस्ते मिळाला सन्मान, आई- वडिलांना समर्पित केला सन्मान,
अमरावती – अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांना भारत मंच ट्रस्टच्या वतीने युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणारा राष्ट्रीय युवा देशरत्न सन्मान अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांना नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालय माजी मुख्य न्यायाधीश एवं न्यायाधीश केजी बालकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून त्यांना है सन्मान देण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये मध्ये संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा शर्मा या उपस्थित होत्या तर सुप्रीम कोर्ट बार काउंसिलचे माजी अध्यक्ष अड. आदेश अग्रवाल,दिल्ली पुलिसचे जॉइंट कमिश्नर अशोक कुमार,एसीपी क्राइम ब्रांच संदीप मल्होत्रा,भारत मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ एम ए खान, शिवधाराचे अध्यक्ष डॉ संतोष साई महाराज उपस्थित होते.
अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रातील विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया सह सार्क देशात युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत - राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा संदेश दिला आहे.डॉ गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीलाराष्ट्रीय पातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या सन्मानासाठी अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणारा राष्ट्रीय युवा देशरत्न सन्मानासाठीसाठी देशभरातून नामांकन मागविण्यात आले ज्यात अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांची निवड करण्यात येऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यासाठी एक विशेष निवड टीमने अमरावतीमध्ये भेट देऊन डॉ. मनीष गवई यांच्याबाबतचे माहिती घेऊन प्रत्यक्ष निवड करणात आली हे विशेष.त्यांच्या या सन्मानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदास आठवले, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ अनिल बोन्डे,आमदार रवी राणा, माजी खासदार श्रीमती नवनीत राणा, माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई,अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. डॉ. मनीष गवई यांनी आपला हा सन्मान आपल्या आई- वडिलांना समर्पित केला असून अमरावतीकरांचे विशेष आभार देखील मानले आहे.