ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट व मुख्याध्यापक दिलीप सदार यांची रिदम व रूहान सह ताकवाटपास हजेरी
अमरावती : राजापेठ येथील निवासी असलेले ज्येष्ठ समाजसेवक तथा व्यावसायिक अमृतभाई मुथा त्यांच्यासोबत सामाजिक कार्यांमध्ये उत्साहाने सहभागी होणारे राजापेठ मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, दर रविवारी सकाळी साधारणपणे अकरा वाजेपर्यंत रस्त्याने ये-जा करणाऱ्या सर्व नागरिकांकरिता, ऑटोवाले, रिक्षा चालक, प्रवासी, मजूरवर्ग या सर्वांकरिता जिलेबी व त्यासोबतच ताक वाटप केले जाते. अत्यंत वर्दळ असलेल्या या राजापेठ चौकात अमृतभाई मुथा यांचे मुथा साडी सेंटरला लागून अमृतभाई मुथा व राजापेठ मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते चौकात मोठ्या उत्साहाने गेल्या अनेक वर्षांपासून चौकात ताक वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत.
ताकाचा गुणधर्म हा अतिशय थंड असल्यामुळे उन्हाळ्यात ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.ताक हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. गॅस, अपचन यांसारख्या पचन समस्या दूर करते. ताक प्याल्याने शरीर हायड्रेटेड राहते. ताकात प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असल्यामुळे भूक कमी होऊन वजन कमी होण्यास खूप चांगली मदत होते. त्याचप्रमाणे ताकात असलेल्या प्रथिने व जीवनसत्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळून ताकातील कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वे हाडांना सुद्धा मजबूत बनवितात. ताकामुळे आपली त्वचा सुद्धा चमकदार व निरोगी बनते. ताक हे बी१२ चा खूप चांगला स्त्रोत आहे जो मज्जासंस्थेसाठी आणि शरीरात ऊर्जा उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक ठरतो.
यावर्षी सुद्धा उन्हाळा सुरू झाल्या बरोबर गेल्या महिनाभरापासून ताक वाटप दर रविवारी नियमिपणे सुरू आहे. ताक वाटपाच्या या कार्यक्रमात डॉ.गोविंदभाऊ कासट, ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शनजी गांग, प्राचार्य डॉ.सुभाष गवई,डॉ. राजू डांगे, शाकीर नायक, विवेक सहस्त्रबुद्धे, उमेश वैद्य राजेंद्र पचगाडे, ईश्वर हेमने, दिलीप सदार अशा मित्रमंडळीच्या सुद्धा अनेकांचा दरवर्षी या ताक वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो. नुकतेच या रविवारी डॉ.गोविंदभाऊ कासट, विवेक सहस्त्रबुद्धे व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व त्यांची दोन्ही मुले रिदम व रूहान यांनी या राजापेठ मित्र मंडळाच्या ताक वाटप कार्यक्रमाला हजेरी लावून येणाऱ्या- जाणाऱ्या सर्वांना बोलावून- बोलावून जिलेबी व ताक वाटप केला. रिदम( वय११ वर्ष )आणि रूहानला( वय ७ वर्षे) सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप आनंद झाला. पुढच्या रविवारी सुद्धा आम्ही दोघे पुन्हा ताक वाटपाला येऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
राजापेठ मित्रमंडळाच्या या अत्यंत स्तुत्य कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक डॉ.गोविंदभाऊ कासट, अमृतभाई मुथा, परम मुथा, प्रकाशजी मुणोत, तनिष भन्साली, सुरेश साबद्रा, रमेश साबद्रा, इंदर सुराणा, विवेक सहस्त्रबुद्धे, दिलीप- रिदम- रूहान सदार, अनिल बोथरा, नरेश कंठालिया, अक्षय ओस्तवाल, दिलीप बरडिया, शीतल सिंघवी, गिरीश भन्साली, रतन भन्साली, मानक ओस्तवाल,अक्षय मुथा, प्रकाश बोकडिया, प्रमोद देशमुख इत्यादी सर्वांसह राजापेठ मित्र मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांची स्वयंस्फूर्तीने उपस्थिती होती.