महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती निमित्त महानगरपालिकेत सेवा हक्क दिन साजरा
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने या दशकापूर्तीचे औचित्य साधून दिनांक २८ एप्रिल,२०२५ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवा हक्क दिन शपथ घेतली.
लोकसेवा हक्क दिन साजरा करतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सदैव तयार राहू असा संकल्प केला. महानगरपालिका विविध विभागामार्फत सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत सेवा देते. याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य कार्यालयात तसे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेतर्फे नागरिकांकरीता क्युआर कोड तयार करण्यात आले आहे. सदर क्युआर कोड स्कॅन करुन नागरिकांना विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.
यावेळी लोकसेवा हक्क दिनानिमित्य उपायुक्त डॉ.मेघना वासनकर व मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही हक्क दिनानिमित्य पथनाट्य सादरीकरण केले.
यामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सेवा हक्का हक्काबाबत (Maharashtra Public Service Act) जागरूकता निर्माण व्हावी याकरिता महानगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांनी लोकसेवा सेवा हक्काची शपथ घेतली.
यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, नगरसचिव संदिप वडुरकर, कार्यशाळा उपअभियंता स्वप्निल जसवंते, उपअभियंता विवेक देशमुख, एस.एस.तिनखेडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.