AmravatiLatest NewsLocal News
विद्यापीठातील एम.बी.ए. विभागाच्या विद्याथ्र्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापन विभागातील (एम.बी.ए.) 42 विद्याथ्र्यांची विविध क्षेत्रातील नामांकित संस्था व कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. सहा विद्याथ्र्यांनी डी-मार्टमध्ये, एक विद्यार्थी लर्निंग रुट्स प्रा. लि.मध्ये, याव्यतिरिक्त सहा विद्यार्थी इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत, दोन विद्यार्थी एसबीआय इन्शूरन्समध्ये, दोन जस्ट डायलमध्ये, एक इंडिया मार्टमध्ये, दोन निवा बुपा हेल्थ इन्शूरन्समध्ये, तीन श्रीराम फायनान्समध्ये, तीन बुस्टनाऊमध्ये, तीन एअरटेलमध्ये, तीन सालासर स्टीलमध्ये, आठ विद्यार्थी एलीगन्स एंटरप्राईज, एक पब-लर्न व एका विद्याथ्र्याला एच.डी.एफ.सी. अॅग्रो इन्शूरन्समध्ये नियुक्ती मिळाली आहे. विद्याथ्र्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ईएसएएफ कंपनीमध्ये शुभम इंदुरकर, कु. श्रृती पटालिया, कु. दीपाली देशमुख, कु. प्राप्ती चौधरी, रोहीत उपाध्याय, कु. वैष्णवी झोपाटे, डी-मार्टमध्ये शुभम इंदुरकर, कपिल भेंडे, कु. जयश्री अमोडे, कु. माधुरी अघम, कु.मृणाल पिसाळ, कु. प्राप्ती चौधरी, लर्निंग राऊट्समध्ये कु. दीपाली देशमुख, निवा बुपा हेल्थ इन्शूरन्समध्ये कु. श्रृती तायवाडे, कु. सरिता वानखेडे, एअरटेल कंपनीमध्ये कु. दीपाली देशमुख, कु. श्रृती तायवाडे, बुस्ट नाऊ कंपनीमध्ये रुमान शेख, आचल ठाकरे, विशाल निंभाळकर, पब-लर्न कंपनीमध्ये कु. श्रृती तायवाडे, सालासार अलोय अॅन्ड स्टिल इन्डस्ट्रिज प्रा. लि. मध्ये विशाल निंभाळकर, सुमित जुंबळे, सरिता वानखेडे, श्रीराम फायनान्समध्ये सुयोग महल्ले, गजानन सूर्यकर, भावेश चांदुरे, एस.बी.आय. लाईफ इन्शूरन्समध्ये शुभम इंदुरकर, कपिल भेंडे, एलिगन्स एन्टरप्राईजेसमध्ये कु. अर्पिता सूर्यवंशी, रोहीत उपाध्याय, अभिषेक बनकर, सुमित जुंबळे, कु. सरिता वानखेडे, शिवानंद येवले, विशाल निंभाळकर, आचल ठाकरे या विद्याथ्र्यांना नोकरी मिळाली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विविध करिअर संधी शोधणे आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्याथ्र्यांना सक्षम करण्यात एम.बी.ए. विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याची विशेष दखल घेत कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थी तसेच व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापन विभागाचे कॉर्पोरेट जगासाठी मार्गदर्शन आणि तयारी करण्यासाठी समर्पित प्रयत्नांबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले. कठोर शैक्षणिक कार्यक्रम, प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण आणि मजबूत उद्योग सहकार्य यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आपल्या विद्याथ्र्यांना आजच्या स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात भरभराटीसाठी आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान देऊन सक्षम करीत आहे. सर्व विद्याथ्र्यांचे यापुढेही जास्तीत जास्त प्लेसमेंट होणार असल्याचे सांगून सर्व विद्याथ्र्यांचे एम.बी.ए. विभाग प्रमुख डॉ. दिपक चाचरकर यांनी अभिनंदन केले.