Padma Awards: शेखर कपूर, अजित कुमार, नंदामुरी बालाकृष्ण यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : सोमवारी 28 एप्रिल रोजी संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडप याठिकाणी आयोजित कार्यक्रमात 2025 साठी जाहीर करण्यात आलेल्या 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी एकूण 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, पैकी पहिल्या टप्प्यात 71 जणांना 28 एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनोरंजन विश्वातील काही दिग्गजांचादेखील पद्म पुरस्कार देऊन सन्मना करण्यात आला.
कलाविश्वातील दिग्गजांचा सन्मान
सोमवारी अभिनय क्षेत्रातील ज्या कलाकारांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने अभिनेते अजित कुमार, नंदमुरी बालाकृष्ण, दिग्दर्शक शेखर कपूर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या कलाकारांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. तसेच 4 दशकांमध्ये 60 हून अधिक अल्बम आणि 500 हून अधिक गजल गाणाऱ्या दिवंगत गजल गायक पंकज उधास यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यांच्या पत्नी फरिदा पंकज उधास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कलाक्षेत्रातील इतर दिग्गजांमध्ये मल्याळम लेखक-दिग्दर्शक, पटकथा लेखक, आणि मल्याळम भाषा, सिनेमा आणि साहित्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एम टी. वासुदेवन नायर यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कर्नाटकातील प्रसिद्ध व्हॉयलिन वादक डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध गायिका के.ओमानकुट्टी अम्मा, जसपिंदर नरुला, गायक श्री जोयनाचरण बाथरी, भेरू सिंह चौहान, रणेंद्र भानु मजूमदार, कर्नाटक सिनेइंडस्ट्रीतील स्टंट दिग्दर्शिक हसन रघु यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘या’ दिग्गज कलाकारांना जाहीर झाले आहेत पद्म पुरस्कार
गायक पंकज उधास (मरणोत्तर)-पद्म भूषण
अभिनेते नंदमुरी बालकृष्ण- पद्मभूषण
अभिनेते अजित कुमार-पद्मभूषण
फिल्म निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर-पद्मभूषण
अभिनेता अनंत नाग- पद्माभूषण
अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ- पद्मश्री
गायक अरिजीत सिंह- पद्मश्री
अभिनय प्रशिक्षक, थिएटर दिग्दर्शक बैरी गॉडफ्रे जॉन-पद्मश्री
गायिका जसपिंदर नरूला- पद्मश्री
गायक अश्विनी भिडे-देशपांडे- पद्मश्री
संगीतकार रिकी ज्ञान केज-पद्मश्री
लोकगायक भेरू सिंह चौहान- पद्मश्री
भक्ति गायक हरजिंदर सिंह श्रीनगर वाले- पद्मश्री
लोक संगीतकार जोयनाचरण बाथरी- पद्मश्री
शास्त्रीय गायिका के ओमानकुट्टी अम्मा- पद्मश्री
गायक महाबीर नायक – पद्मश्री
अभिनेत्री ममता शंकर -पद्मश्री
स्टंट दिग्दर्शक हसन रघू- पद्मश्री