केंद्राचा ऐतिहासिक निर्णय ! देशभरात 2025-26 मध्ये देशात होणार जातनिहाय जनगणना, केंद्रीय मंत्रिमंडळाची घोषणा,

नवी दिल्ली : मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने देशातील राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतात जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारच्या सामाजिक न्यायावरील वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
मागासवर्गीयांना सक्षम करणे हेच आमचं ध्येय” – अमित शाह
गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या मोदी सरकारने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जातीची गणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक समानता आणि प्रत्येक वर्गाच्या हक्कांप्रती दृढ वचनबद्धतेचा संदेश दिला आहे.”
वंचितांच्या प्रगतीसाठी नवा मार्ग मोकळा
अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं,
काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दशके सत्तेत असताना जातीय जनगणनेला विरोध केला आणि विरोधी पक्षात असताना त्यावर राजकारण केलं. मात्र आजचा निर्णय सर्व आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गांना सक्षम करेल, समावेशाला प्रोत्साहन देईल आणि वंचितांच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग मोकळा करेल.”