अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा स्थापना दिवस साजरा महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण
अमरावती : अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा स्थापना दिवसानिमित्त महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक १ मे,२०२५ रोजी अमरावती मनपाच्या प्रांगणात सदर ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी ठिक ७.१५ मिनिटांनी घेण्यात आला.
यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा स्थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ वा स्थापना दिवसानिमित्त महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते सफाई कामगार श्री कैलाश रामजीलाल निंधाने, श्रीमती जयश्री संजय बागडे, श्रीमती नितु महेंद्र हडाले, श्री विनोद तंबोले, श्रीमती निर्मलाबाई हिरालाल पछेल, श्री राजकुमार बंडु पासरे, श्री प्रकाश मार्वे, श्रीमती प्रिया बग्गन, श्री तुषार बिवाड, श्रीमती देवका सुभाष गोहर यांना गणवेश वाटप करण्यात आले.
जिल्हा शोध व बचाव पथकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते अग्निशमन विभागातील फायरमन श्री अमोल साळुके, श्री श्रीकांत जवंजाळ, श्री अतुल कपले, श्री योगेश ठाकरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्यगीत (समूहगीत) सादरीकरण करण्यात आले. सदर महाराष्ट्र राज्यगीत सादरीकरण अमरावती मधील अॅकॉस्टिक अॅकॅडमी चे सुयोग ढोकणे, अमेय येळणे, सिद्धांत वर्मा, कौस्तुभ मेहरे, देव पांडे, हनी आहुजा, वेदांती बर्डे, अजिंक्य आवारे यांनी केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते मनपा मराठी शाळा क्र.१७ विलास नगर, मनपा मराठी शाळा क्र.१८ प्रविण नगर, मनपा हिंदी मुलींचे हायस्कुल नागपुरी गेट येथील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँन्ड पथकाने यावेळी राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.बी. सोनवणे सर व विजय खंडारे सर यांनी केले.
या ध्वजारोहण कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सुभाष जानोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, अग्निशमन अधिक्षक संतोष केंन्द्रे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता प्रमोद इंगोले, नितीन बोबडे, अजय विंचुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.