AmravatiamravatinewsLatest News
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

अमरावती : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त (साप्रवि) अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.