AkolaLatest News
वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरोधात अकोल्यात शांततापूर्ण आंदोलन

अकोला : वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरोधात मुस्लिम बांधवांच्यावतीने आणि बहुजन समाजाच्या सहभागाने आज अकोल्यात शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. रात्री ९:०० ते ९:१५ वाजेपर्यंत, नागरिकांनी घरे, दुकाने, कारखाने आणि कार्यालयांचे दिवे बंद करून निषेध नोंदविला.
हे आंदोलन केंद्र सरकारकडून वक्फ बोर्ड संशोधन विधेयक तात्काळ मागे घ्यावे, या मागणीच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आले होते. आंदोलनात कोणताही गोंधळ किंवा असंतोष न होता, पूर्णपणे ऐच्छिक आणि शांततेत नागरिकांनी सहभाग नोंदवला.
अकोल्यातील अनेक भागांमध्ये १५ मिनिटांचे अंधार आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. नागरिकांनी घरगुती दिवे, व्यावसायिक ठिकाणांचे लाईट्स बंद ठेवून आपली भूमिका शांततेत स्पष्ट केली. कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
सिटी न्यूज प्रतिनिधी – गुलाम मोहसिन