“दाढी न काढल्यामुळे पत्नीने सोडले” — मेरठमध्ये विचित्र कौटुंबिक वादाची चर्चा

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने मी दाढी करण्यास नकार दिल्याने माझी पत्नी मला सोडून गेली आहे, असा दावा केलाय. विशेष म्हणजे या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार त्याची पत्नी त्याच्याच भावाबरोबर म्हणजेच दिराबरोबर पळून गेली आहे. माझा भाऊ दाढी ठेवत नाही त्यामुळे ती त्याच्याबरोबर पळून गेली, असं या व्यक्तीने म्हटलं असून आता या महिलेला दिराबरोबरच संपूर्ण आयुष्य राहायचं असल्याचीही माहिती समोर येत आहे.
सात महिन्यांपूर्वी झालेला निकाह
सात महिन्यांपूर्वी मोहम्मद सागीर नावाच्या तरुणाने अर्शी नावाच्या महिलेशी निकाह केला. निकाहदरम्यान सागीरने व्हाइट कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता तर अर्शीने हिरव्या रंगाचा सूट आणि सोन्याचे दागिने घातलेले. सागीरने निकाह असल्याने दाढीही काढली होती. मात्र दाढी वाढल्यानंतर पत्नी आपल्याला सोडून जाईल याचा अंदाजही त्याला त्यावेळी नव्हता. दोघांमध्ये दाढीवरुन कथित वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.
दाढीवरुन वाद
लग्नानंतर काही दिवसांमध्येच अर्शीने सागीरच्या दाढीसंदर्भात आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली. आर्शीने सागीरला दाढी काढून टाकण्यास सांगितलं. मात्र सागीरला त्याची दाढी फार प्रिय असल्याने त्याने या मागणीला अनेकदा नकार दिला. दाढीच्या मुद्द्यावरुन वारंवार या पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. अनेकदा या भांडणाचा आवाज अगदी घराबाहेरपर्यंत यायचा.
पत्नीचा दावा काय?
दिराबरोबर पळून गेलेल्या महिलेने आपण तो दाढी करत नसल्याने पळून गेलेलो नाही असं सांगितलं आहे. माझा पती लैंगिकदृष्ट्या कमजोर असल्याने मी त्याला सोडून पळाल्याचं महिलेने म्हटलं आहे.
दिरावर जडला जीव
याच कालावधीमध्ये अर्शीचा जीव तिचा दीर साबीरवर जडला. साबीर हा भावाच्या अगदी विरुद्ध होता. त्याला क्लिन शेव्ह ठेवायला आवडायचं. अर्शी आणि साबीरमधील जवळीक वाढत गेली आणि फेब्रुवारीमध्ये दोघे घर सोडून पळून गेले. अर्शी आणि साबीर एकमेकांसोबत पळून गेल्याचा सागीरचा आरोप आहे.
दोघे माझी सुपारी देणार होते
सागीरने अर्शीला शोधण्याचा फार प्रयत्न केला. नंतर त्याने बराच दिवस ती परत येईल या आशेत गालवले. मात्र तीन महिन्यानंतरही त्याला पत्नीचा काहीच पत्ता न लागल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. “अर्शी माझ्या दाढीबद्दल सतत तक्रार करायची. तिने कौटुंबिक दबावाखाली माझ्याशी लग्न केलं. ती माझ्या छोट्या भावासोबत घर सोडून पळून गेली. त्यांच्यातील प्रेमळ बोलण्याच्या रेकॉर्डींग माझ्याकडे आहेत. या संवादामध्ये ते दोघे मला अन्नातून विष देण्याबद्दल किंवा माझी सुपरी देण्याबद्दल बोलत आहेत. मला बाजूला काढल्यास त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला असता,” असं सागीर म्हणाला आहे.
…तर मला घटस्फोट नको पण मी दिराबरोबरच राहीन
बुधवारी अर्शी तिच्या आईच्या घरी दाखल झाली. तिने आपल्याला सागीरबरोबर संसार करायचा नाही असं सांगितलं आहे. अर्शीने माझं लग्न शाबीरबरोबर लावून द्या अशी मागणी केली आहे. दाढीवरुन कोणताच वाद नव्हता. सागीर हा लैंगिकदृष्या सक्षम नसल्याचा दावा अर्शीने केला आहे. या आरोपामुळे दुखावलेल्या सागीरने पोलिसांसमोरच अर्शीला घटस्फोट दिला. अर्शीने सागीरकडून पोटगी म्हणून दिलेले पाच लाख परत करण्याची मागणी केली आहे. “त्याने अडीच लाख रुपये परत केले तर मी त्याला सोडून देईन आणि शाबीरबरोबर लग्न करेन. तो पैसे परत करणार नसेल तर मला घटस्फोट नको आहे. मी माझ्या दिराबरोबर आयुष्य लावेन,” असं अर्शीने म्हटलं आहे.