Amaravti GraminLatest News
भाजप सरकारच्या अपूर्ण आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा ट्रॅक्टर मोर्चा

भातकुली : भाजपने निवडणुकीपूर्वी जनतेला जी आश्वासने दिली होती, त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पश्चिम विदर्भात आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनाचे आयोजन केले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये देखील आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणावर शेतकरी, पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. भाजप सरकारने सहा महिने उलटून देखील निवडणुकीत दिलेली वचने पूर्ण केली नाहीत, म्हणून ही तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
मोर्चाच्या माध्यमातून शिवसेनेने सरकारकडून मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली असून, जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.