महाराष्ट्र ग्राम दर्पण अमरावती च्या वतीने जलजीवन मिशन प्रशिक्षणाचे आयोजन
अमरावती : राज्य पाणी व स्वच्छता विभाग महाराष्ट्र, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद अमरावती तसेच मुख्य संसाधन केंद्र महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत जल जीवन मिशन हर घर जल स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण,अमरावती अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र ,अमरावती येथे प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण मा.रविराज देशमुख(प्रधान सचिव) महाराष्ट्र ग्राम दर्पण,अमरावती यांच्या मार्गदर्शना मध्ये आयोजित करण्यात आले असून प्रशिकक्षणाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वैराग्यमूर्ती गाडगे बाबा,उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये चार(4) जिल्हातील प्रशिक्षक या मध्ये उपस्थित होते. प्रशिक्षणाला श्री गिरीधर चावरे, श्री अरविंद भगत, श्री संजू विंचूळकर यांनी स्त्रोत बळकटीकरण तसेच शाश्वती करण या विषयावर वेगवेगळे विषय घेऊन प्रशिक्षण दिले. त्या सोबतच मंजूषा उताने यांनी सर्व प्रशिकक्षणांना व्यक्तिमत्व विकास या बाबत प्रशिक्षण दिले. श्री सुबोध देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच महाराष्ट्र ग्राम दर्पण ,अमरावती यांच्या अथक परिश्रमातून प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पडले.