महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट सेवेसाठी अमरावतीतील पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिला पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह; विविध क्षेत्रातील गुणवंतांचाही गौरव
अमरावती : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यानंतर राज्यगीत, राष्ट्रगीत व पोलीस पथकाकडून सशस्त्र मानवंदन सादर करण्यात आले.
या वेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, आणि महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयातील चार कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन्मानित पोलीस कर्मचारी पुढीलप्रमाणे:
- दिनेश नेमाडे (वाहनचालक, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन)
- अली खुर्शीद अली सय्यद (गाडगेनगर पोलीस स्टेशन)
- विनोद सिंग चव्हाण (गाडगेनगर पोलीस स्टेशन)
- संगीता सिरसाम (महिला पोलीस कर्मचारी, नियंत्रण कक्ष)
- या सर्वांना शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- गौरवित विद्यार्थी व कर्मचारी:
- श्रुतिका औगड व उन्नती ओगले यांनी गोल्डन ॲरो चाचणी परीक्षेत यश मिळवून विशेष सन्मान प्राप्त केला.
- अक्षय पंत, फायरमन योगेश ठाकरे, व लिडिंग फायरमन सय्यद अन्वर सै अकबर यांना अग्निशमन विभागात अनेक वर्ष दिलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी गौरवण्यात आले.
- प्रीती ठाकरे यांना अवैध गौण खनिज विरोधात प्रभावी कारवाई केल्याबद्दल मोमेंटो व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.