अमरावतीतील दस्तुर नगरमधील नाला तुंबल्याने नागरिक हैराण

अमरावती : झोन क्रमांक 03 अंतर्गत येणाऱ्या दस्तुर नगर, बेनोडा परिसरातील मुंगसाजी मंगल कार्यालयाजवळील नाल्याची स्वच्छता न झाल्यामुळे सध्या संपूर्ण परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा नाला साफ न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचली आहे, परिणामी नाला पूर्णपणे तुंबलेला असून, पाणी प्रवाह ठप्प झाला आहे.
यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास, जनावरे, आणि रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी श्री गोविंदा रेसिडेन्सी, मालू लेआऊट, कलोती नगर येथील नागरिकांनी मनपाकडे ऑनलाईन, व्हॉट्सअॅप व प्रत्यक्ष भेटीद्वारे तक्रार केली होती. परंतु आठ दिवस उलटूनही अमरावती महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही, ही बाब नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी आहे.
नाल्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे व आजारांच्या भीतीने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले असून, तातडीने नाला स्वच्छ करून बंद पाणी प्रवाह सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
नाल्याच्या स्वच्छतेसाठी पुढील नागरिकांनी केली मागणी:
गजानन ठवकर, सतीश माहुरे, नितीन देशमुख, संदीप तायडे, महेश खत्री, आकाश बेदरकर, हरीश पारवाणी, विलास चौधरी, दिनेश सोनी, कपिल बजाज, रचना झा, अनिल डांगे, निलेश सचदेव, विलीसेठ सावलानी, मनीष वरदाणी, अरुण सोनवणे, धीरज आसरा, अतुल फुटाणे, संजय मनवर, जे. डी. डोंगरदिवे, प्रकाश शेळके, सुरज मेश्राम व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.
📢 नागरिकांची स्पष्ट मागणी:
“नाल्याची त्वरित स्वच्छता करून पाणी प्रवाह सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”