जळगावमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू: सासू-नणंदवर खूनाचा आरोप

जळगाव : जळगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील किनोद येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गायत्री कोळी 26 असं विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, गायत्रीने आत्महत्या केली नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा दाबून हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
गायत्रीच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना खाण्यास नकार दिला होता. यावरून किरकोळ वाद झाला होता. मात्र पुढे हा वाद विकोपाला गेला. हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सासरच्या दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्र मयत गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी घेतला आहे. या घटनेचा पोलिस करत आहेत.