नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड : नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात 100 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून, थेट मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत.
11 हजार तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
या मेळाव्यात शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण 11 हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे बेरोजगार तरुणांचे करिअर मार्गी लागणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेदपाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात अनेक अधिकारी, उद्योजक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस अधीक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन
या उपक्रमाबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले की,
“तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहावेत, आणि त्यांना योग्य नोकरी मिळावी या हेतूने पोलिस विभागाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे तरुण व पोलिस यांच्यात समन्वय वाढेल.”