विराट कोहलीच्या एका ‘लाईक’मुळे सोशल मीडियावर खळबळ! अवनीत कौरच्या फोटोवर लाईक अनुष्काच्या वाढदिवसाच्या दिवशीच!
Virat Kohli sparks controversy in middle of IPL 2025: विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील एका अॅक्टिव्हिटीने अचानक खळबळ उडाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या एका लाईकमुळे गोंधळ उडाला आहे. विराटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका अभिनेत्रीचा फोटो लाईक झाला. हे लाईक नेमके विराटच्या बायको अनुष्का शर्माच्या बर्थडे रोजी झाले. यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. त्यानंतर विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टोरी पोस्ट करून या घटनेबद्दल खुलासा केला आहे. या कृतीने लगेचच लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये त्यांची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची खिल्ली उडवली नक्की कोणत्या अभिनेत्रीचा फोटो विराटने लाईक केला? नक्की काय झाले? याबद्दल जाणून घेऊयात…
विराटने दिले स्पष्टीकरण
घडलेल्या घटनेवर सुरुवातीला विराटने मौन बाळगले पण नंतर, जेव्हा त्याने पोस्ट लाईक केल्याचे स्क्रीनशॉट ट्विटर आणि इंस्टाग्रामवर व्हायरल होऊ लागले, तेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे गोष्ट स्पष्ट केली.
कोणत्या अभिनेत्रीचा फोटो विराटने लाईक केला?
अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील पोस्टला त्याने लाईक केल्याचे चाहत्यांच्या लक्षात आल्यावर चर्चेला उधाण आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण आहे?
अभिनेत्री अवनीत कौरने 30 एप्रिल रोजी तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेक फोटो शेअर केले. यामध्ये ती शॉर्ट स्कर्टसह हिरव्या रंगाचा टॉप घातलेली दिसत आहे. त्याचे फोटो अनेकांना आवडले. आणि हार्ट इमोजी बनवले, पण जेव्हा विराट कोहलीने हा फोटो लाईक केला तेव्हा एकच गोंधळ उडाला. कारण अनुष्का शर्माचा वाढदिवस १ मे रोजी होता. त्याच दिवशी विराटला अवनीत कौरचा फोटो लाईक झाला, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावे लागले.
सुरुवातीला विराटने मौन बाळगलेलय विराटने इंस्टाग्राम एक स्टोरी टाकून सगळी घटना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की हे सगळे अल्गोरिदममुळे घडले. त्याला तो स्वतःहून फोटो लाईक करायचा न्हवता. त्याने लिहले की ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे फीड साफ करताना, अल्गोरिथमने चुकून इन इंटरॅक्शन केले . त्यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो यावरून कोणतेही अनावश्यक समजूत करून घेऊ नकात. तुमच्यासामंजस्यासाठी बद्दल धन्यवाद.’ यानंतर, त्याने त्या पोस्टवरून लाईक काढून टाकला.