वैभव सूर्यवंशीवर कारवाई करू नका-हेमंत पाटील
पुणे : अवघ्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल संघाकडून आयपीएल मध्ये खेळतांना विक्रम नोंदवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र,आधारहीन तक्रारीच्या आधारे वैभव वर बीसीसीआय ने कारवाई केली तर आंदोलन करू,असा इशारा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.३) दिला.उदयोन्मुख खेळाडूला त्याच्या खेळातील प्रतिभेने ओळखले पाहिजे,असे मत पाटील यांनी व्यक्त केल.
वयात फसवणूक टाळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या टीडब्ल्यू ३ तंत्रज्ञानाचा वापर करते.या तंत्रामध्ये खेळाडूच्या हाडांच्या परिपक्वतेची तपासणी करण्यासाठी डाव्या हाताचा आणि मनगटाचा एक्स-रे केला जातो. मनगटाच्या स्कॅनमध्ये खेळाडूच्या वयाचा अंदाज लावला जातो, असे पुढे बोलतांना पाटील म्हणाले.कुठलाही भारतीय क्रिकेटर वयासंदर्भात खोटी माहिती देतांना आढळला, तर त्यावर दोन वर्षाची बंदी घातली जाऊ शकते. या कारवाई नंतर संबंधित खेळाडू बीसीसीआय संबंधित कुठल्याही टूर्नामेंट मध्ये खेळू शकत नाही,असे पाटील यांनी स्पष्ट केले.
१४ वर्षीय वैभव ने गुजरात टायटन्स विरोधात खेळतांना ३५ चेंडूत शतकीय पारी खेळली होती. एवढ्या कमी वयातील क्रिकेटर ९०-९० मीटर उंच षटकार मारु शकत नाही, असा दावा यानंतर करण्यात आला.परंतु, बीसीसीआय च्या एज ग्रुप क्रिकेट मध्ये वैभव वयासंबंधी तपासणीत अयोग्य आढळलेला नाही, असे पाटील म्हणाले.केवळ एका व्हिडीओ च्या आधारे चांगल्या क्रिकेटर च्या खेळाडू वृत्तीला आणि उत्कृष्ट खेळीला डावलने संयुक्तीत नाही,असे पाटील म्हणाले.अशात या संदर्भात बीसीसीआय ने योग्य निर्णय घेत कुठलीही कारवाई वैभव वर करू नये, असे आवाहन पाटील यांनी केले.