LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो अकाऊंट चेक करा…खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का?

मुंबई : राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहि‍णींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.

भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल (शुक्रवारी) 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यात देखील काल (शुक्रवारी) पासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा हफ्ता मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरेंनी काय म्हटलंय?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. अशी सोशल मिडिया पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावरती शेअर केली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी उशीर का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल. यापूर्वी लाडक्या बहि‍णींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते. आता लाडक्या बहि‍णींना एप्रिल महिन्याच्या हप्ता काही ठिकाणी मिळाला आहे, तर काही जणांना अद्याप प्रतिक्षा आहे.

किती लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार?
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!