अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार कमी… चोरीचं सावट अधिक! प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा अपयशी?

अमरावती : अमरावतीचं जिल्हा सामान्य रुग्णालय – संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात मोठं शासकीय हॉस्पिटल… पण गेल्या काही महिन्यांपासून उपचारांपेक्षा चोरीचे प्रकार अधिक चर्चेत आहेत! विशेषतः रात्रीच्या वेळेस रुग्णालयातील वॉर्डांमध्ये चोरटे मुक्तपणे वावरताना दिसत असून, गरिब रुग्णांच्या वस्तू चोरीला जात आहेत.
- धक्कादायक प्रकार समोर येत आहेत:
सलाईन लावलेला रुग्ण मोबाईल चोरीस वाचवण्यासाठी वॉर्डाबाहेर धावताना! - वॉर्डात झोपलेल्या रुग्णाच्या खिशातून मोबाईल आणि पैसे गायब.
- महिलांच्या बॅगमधील रोख रक्कम, दागिने चोरीला जाण्याचे प्रकार.
- रुग्णालयात काय आहे, काय नाही?
पोलीस चौकी अस्तित्वात आहे. - खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक आहे.
- सीसीटीव्ही कॅमेरे काही भागांमध्ये कार्यरत आहेत तरीही चोरीचे प्रकार थांबलेले नाहीत.
- पूर्वी पकडले गेलेले चोरटे पुन्हा सक्रिय?
- सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी चोरीप्रकरणी काही संशयितांना पकडण्यात आले होते. परंतु, त्याच टोळक्यांचे सदस्य आता पुन्हा सक्रीय झाल्याची भीती रुग्णांमध्ये आहे.
रुग्णांचे हाल:
अनेक गरीब रुग्ण आणि नातेवाईक आपल्या वस्तूंची सुरक्षा करण्यासाठी रात्रभर जागून वेळ घालवत आहेत.
मेळघाट, चिखलदरा, धारणीसारख्या दुर्गम भागातून आलेल्या रुग्णांचे विशेष हाल.
प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप.
आम्ही उपचारासाठी आलो, पण आता आमचं सामान वाचवणं ही मोठी काळजी झाली आहे.” – रुग्णांचे कळवळलेले शब्द.
प्रश्न गंभीर आहेत:
रुग्णालयात एवढ्या सुरक्षेच्या दाव्यांनंतरही चोरट्यांचा मुक्त वावर कसा?
प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांचं समन्वय कुठे कमी पडतंय?
गरीब रुग्णांचा वाली म्हणवलं जाणारं सरकारी हॉस्पिटल त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी का?
आता तरी प्रशासन जागं होणार का?
सध्या तरी प्रशासन मौन बाळगतंय आणि चोरटे बेधडक फिरत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी तात्काळ ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.