AkolaLatest News
अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यात दिलासा

अकोला : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या अकोल्यात तापमान ४२ अंश सेल्सियसच्या आसपास पोहचले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून थोडा दिलासा मिळाला आहे.
मात्र या पावसामुळे दुसरीकडे शेतीपिकांना धोका निर्माण झाला असून, पिकांच्या नुकसानीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे निर्माण झालेलं ढगाळ वातावरण शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारे आहे.
सध्या उभ्या पिकांच्या टप्प्यावर असलेल्या भाजीपाला, कापूस, आणि फळबागांवर पावसाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.