अचलपूर : युवा स्वाभिमान पार्टीतर्फे मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

अचलपूर – युवा स्वाभिमान पार्टीच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री. रविभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
नगर परिषद प्राथमिक मराठी शाळांमध्ये जेथे शौचालय आणि बाथरूम उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी तत्काळ बांधकाम करणे.
2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा सर्वे करून त्यांना शासन निर्णयानुसार घरपट्टे किंवा पीआर कार्डचे वितरण करणे.
पावसाळ्यापूर्वी अचलपूर व परतवाडा येथील सर्व नद्या व नाल्यांची स्वच्छता तसेच रूंदीकरण व खोलीकरण करणे.
चांदुर बाजार नाका चौकातील बंद असलेला हायमास्ट पथदिवा सुरू करणे.
पात्र लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देणे.
गेल्या 20-25 वर्षांपासून भाड्याने राहणाऱ्या बेघरांना कायमस्वरूपी सरकारी जागा उपलब्ध करून देणे.
अचलपूर-परतवाडा येथील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
युवा स्वाभिमान पार्टीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, या मागण्या आठवड्याभरात मार्गी न लागल्यास अचलपूर-परतवाडा येथील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
या निवेदनप्रसंगी रविभाऊ वानखडे, तेजाराम धवने, राहुल वानखडे, कैलास गणेशे, सुमेध मोहोळ, मायाताई धवने, रोहित सिंग, राजेश गावंडे, वैभव बोकडे, गौरव नाकील, शिवा बोके, अभिजीत गाडबैल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.