उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्या-कुठल्या शहरात मॉकड्रील होणार, एका क्लिकवर जाणून घ्या

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मॉक ड्रील करण्याचा आदेश दिला आहे. युद्ध स्थितीचा कसा सामना करायचा त्यासाठी हे मॉक ड्रील आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, उद्या 7 मे रोजी ही मॉक ड्रील होणार आहे. शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा, ते ट्रेनिंग या दरम्यान नागरिकांना दिलं जाईल. सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे. देशात शेवटची मॉक ड्रील 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी झाली होती.
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबईत डीजी कार्यालयात महत्त्वाची बैठक. बैठकीत मुंबई आणि उपनगर जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच नागरी सुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित. बैठकीत सात मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेत आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांनी कशा प्रकारे वागावे, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती. तीन सत्रांमध्ये ही मॉक ड्रिल राबवण्यात येणार असून, यामध्ये सायरन तपासणी, नागरिकांचे स्थलांतर, बचाव कार्य आदी प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत.
महाराष्ट्रात कुठल्या शहारत मॉक ड्रील होणार जाणून घ्या
मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हायअलर्ट मोडवर
प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश. नाशिक जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉक ड्रील. नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रील
आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मंत्रालयात सुरू
मॉक ड्रिल च्या पाश्वभूमीवर राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मंत्रालयात सुरू. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीश खडके यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरवात झाली आहे. राज्यातील सर्व महापालिकेचे आयुक्त आणि प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हीसी द्वारे या बैठकीला सुरवात झाली आहे.
“गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 16 शहरांचा समावेश आहे. या मॉक ड्रिलसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मुंबईत देखील ठिकठिकाणी मॉक ड्रिल केले जाईल. यामध्ये जिल्हाधिकारी आणि इतर संस्था सहभाग घेतील. यामध्ये सायरन अलर्ट, फायर, रेस्क्यू इत्यादी बाबींचा समावेश असेल. जनतेला आवाहन आहे की कोणीही यामुळे पॅनिक होऊ नका”
प्रभात कुमार संचालक, नागरी संरक्षण दल
सायरन वाजल्यावर काय करालं?
तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं.
5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.
फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.
घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.
टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.
सायरन कुठे-कुठे लागणार?
सरकारी भवन
प्रशासनिक भवन
पोलीस मुख्यालय
फायर स्टेशन
सैन्य ठिकाणं
शहरातील मोठे बाजार
गर्दीच्या जागा
सिविल मॉक ड्रिलमध्ये कोण-कोण?
जिल्हाधिकारी
स्थानीय प्रशासन
सिविल डिफेंस वार्डन
पोलिसकर्मी
होम गार्ड्स
कॉलेज-स्कूल विद्यार्थी
नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)
नॅशनल सर्विस स्कीम (NSS)
नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS)